Mumbai Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा ब्लॉक, 960 लोकल फेऱ्यांवर परिणाम
मुंबईत पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी 31 ऑगस्टपासून 35 दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले असून, यातील पाच दिवस 10 तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी 31 ऑगस्टपासून 35 दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले असून, यातील पाच दिवस 10 तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत 960 लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असून, मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे. दरम्यान, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नसल्याने पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. याची जोडणी अन्य मार्गिकेला देण्यासाठी पाच ठिकाणी कट अँड कनेक्शन करण्यात येईल. (हेही वाचा - Mumbai Local Updates: पश्चिम रेल्वे मार्गावर आजही AC मुंबई लोकलच्या काही फेर्या तांत्रिक त्रृटींमुळे Non AC धावणार; इथे पहा वेळापत्रक)
पहिला ब्लॉक
- 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
- कालावधी : 10 तास
- लोकल फेऱ्या : 150 रद्द, 50 अंशत:
दुसरा ब्लॉक
- 7 ते 8 सप्टेंबर
- कालावधी : 10 तास
- लोकल फेऱ्या : 150 रद्द, 50 अंशत:
तिसरा ब्लॉक
- 21 ते 22 सप्टेंबर
- कालावधी : 10 तास
- लोकल फेऱ्या : 150 रद्द, 50 अंशत:
चौथा ब्लॉक
- 28 ते 29 सप्टेंबर
- कालावधी : 10 तास
- लोकल फेऱ्या : 180 रद्द, 50 अंशत:
पाचवा ब्लॉक
- 5 ते 6 ऑक्टोबर
- कालावधी : 10 तास
- लोकल फेऱ्या : 100 रद्द, 30 अंशत:
झाल्यामुळे गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवरील रेल्वेचा भार कमी होईल. सध्या मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या रेल्वेगाड्या गोरेगाव-बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवल्या जात आहेत. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका सुरू झाल्यावर अप आणि डाउन रेल्वेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील.