Mumbai Rape Case: मुंबईकर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या लुधियाना मधून आवळल्या मुसक्या

बलात्कारासोबतच पीडीतेने आरोपीकडून हुंडा मागितला असल्याची देखील तक्रार दिली आहे.

Arrest | (Representative Image)

पंजाब (Punjab) च्या लुधियाना (Ludhiana) येथून 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीवर एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) एक पथक लुधियाना मध्ये पोहचले आणि त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांनी सदर घटनेची माहिती दिली आहे.

आरोपी राघव राजेश अग्रवाल याची आणि पीडीतेची भेट दिल्लीमध्ये एका एक्झिबिशन मध्ये झाली होती. मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2024 दरम्यान ते अनेकदा भेटले होते. असे खार पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. नक्की वाचा: Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.

 लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

लग्नाचं वचन दिल्यानंतर त्यांचा 'रोका' (लग्नापूर्वीचा विधि) देखील झाला होता.लग्नासाठी 'हॉल' बूक केला होता. मात्र त्याने नंतर सारे प्लॅन्स उधळून लावले. पीडीतेने आरोपीकडून हुंडा मागितला असल्याची देखील तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला लुधियाना मध्ये ट्रेस करण्यात आलं. त्यांच्यावर हुंडा विरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement