Ganpati Special ST: चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 75 टक्के जादा बसेस बुक
प्रवाशांची वाढती मागणी पाहता गतवर्षीच्या तुलनेत बसची संख्या वाढवण्यात आली आहे.
Ganpati Special ST Bus: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लालपरी चाकरमान्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2024) एसटी महामंडळाने मुंबईहून कोकणात 4,300 जादा बसेस (Extra Buses) पाठवल्या आहेत. सध्या, यापैकी 75% बस सणाच्या अवघ्या 10 दिवस अगोदर पूर्ण बुक झालेल्या आहेत. 26 जुलै रोजी बस बुकिंग सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे 3,196 सीट बुक झाले आहेत. ज्यात 2,439 ग्रुप बुकिंगचा समावेश आहे.
बृहन्मुंबई ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त, एसटी महामंडळाने या वर्षी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता गतवर्षीच्या तुलनेत बसची संख्या वाढवण्यात आली आहे. या जादा बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून 2 सप्टेंबरपासून सुरू होतील. (हेही वाचा -Ganpati Festival 2024 Special Trains By WR: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्यांना पश्चिम रेल्वेकडून चालवल्या जाणार 6 स्पेशल ट्रेन; इथे पहा संपूर्ण यादी)
दरम्यान, 3 ते 7 सप्टेंबरपर्यंत एसटीचे कर्मचारी बसस्थानक आणि स्टँडवर सुरळीतपणे काम करण्यासाठी तैनात राहणार आहेत. कोकणातील महामार्गालगत वाहन दुरुस्ती पथके स्थापन केली जाणार आहेत. तथापी, गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून 202 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईसह उपनगरातील लोक मोठ्या संख्येने कोकणात येतात. त्यामुळे या वर्षी मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 202 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा - Ganpati Special Trains: आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 'गणपती विशेष गाड्यांची' घोषणा; जाणून घ्या ट्रेन्स, वेळा, थांबे आणि कधी सुरु होणार बुकिंग)
यामध्ये मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड, सीएसएमटी-रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते कुडाळ, एलटीटी-सावंतवाडी रोड, एलटीटी-कुडाळ एसी स्पेशल, दिवा-चिपळूण-दिवा मेमू इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गणपती स्पेशल ट्रेनमध्ये तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे.