Congress MP Vasant Chavan Dies: काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

खासदार खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Photo Credit- X

Congress MP Vasant Chavan Dies: ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार (Nanded Congress MP) वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मोठ्या कालावधीपासून वसंत चव्हाण आजारी होते. आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधार होत नव्हता. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये (Kims Hospital Hyderabad)त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (हेही वाचा: MLA P. N. Patil Dies: काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांचे निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी)

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर विजय

नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. तत्कालिन भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता. त्यामुळे चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif