महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभा निवडणूकीसाठी तयारी झाली आहे. येत्या 3-4 महिन्यात आता त्याचेही रणशिंग फुंकले जाणार आहे त्यामुळे सारेच पक्ष तयारीला लागले आहेत. मनसे कडूनही विधानसभेसाठी तयारी सुरू झाली असल्याची माहिती आज अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दिली आहे. आपण विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' वरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) मारलेल्या टोमण्याचं देखील उत्तर दिलं आहे. अमित ठाकरेंच्या आधी मनसे कडूनची उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
'बिनशर्ट पाठिंबा' वर काय म्हणाले अमित ठाकरे
वरळीत मागच्या विधानसभेतच्या वेळेस राजसाहेबांनी जेंव्हा 'बिनशर्त' पाठींबा दिला होता, त्यामुळे ज्यांचा मुलगा आमदार म्हणून निवडून आला, त्यांनीच असले विनोद करावेत याचं आश्चर्य वाटतं... कोणी कोणासाठी काय केलं आहे हे विसरलं नाही पाहिजे. राहिला विधानसभा निवडणुकीचा प्रश्न.. तर… pic.twitter.com/szGvipiQOP
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 21, 2024
अमित ठाकरे यांनी काका उद्धव ठाकरे यांच्या 'बिनशर्ट पाठिंबा' वरून केलेल्या टोलेबाजीला उत्तर दिलं आहे. ही शाब्दिक कोटी समजायलाच 10 मिनिटं गेली. 'पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या मुलाला आमदार बनवताना राज ठाकरेंनी दिलेला 'बिनशर्त पाठिंबा' घेताना काही वाटलं नाही का? ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान वरळी मध्ये असलेलं आदित्य ठाकरेंच्या कामगिरी बद्दल बोलताना त्यांनी आता शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही होणार नाही. एका आमदाराला पाच वर्ष मिळतात. वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरताना दिसले नाहीत. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत. Shiv Sena Foundation Day 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान, '...जाहिरनाम्यात जे सांगितले ते पूर्ण करा' .
मनसेच्या 'बिनशर्ट पाठिंबा' वर प्रतिक्रिया
शालिनी ठाकरे
राजसाहेब सगळे निर्णय उघडपणे घेतात. बंद खोलीत, महाराष्ट्राच्या जनतेपासून लपवून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करत नाहीत.
उघडपणे 'बिनशर्त' पाठींबा द्यायला जिगर लागते आणि ती फक्त आता एकाच 'ठाकरे ' मध्ये आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे!!@mnsadhikrut @RajThackeray#mnsadhikrut #rajsaheb
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 20, 2024
संदीप देशपांडे
हिरव्या मतांमुळे काही जागा जिंकणाऱ्यांना पाणचट जोक मारायची जुनी सवय आहे ! येणाऱ्या विधानसभेत मराठी माणूस यांचे कपडे साबूत ठेवणार नाही एवढं नक्की ! pic.twitter.com/PXdE9CThie
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 20, 2024
गजानन काळे
त्या औरंगजेबाची औलाद अबू आझमीचा उघडा नागडा पाठींबा घेणार्यांना बिनशर्तचा अर्थ कळणे तसेही कठिणच ...!!!
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 20, 2024
अमित ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात ?
आदित्य ठाकरेंनंतर अमित ठाकरे देखील निवडणूकीच्या रिंगणार उतरणार का? याची चर्चा सुरू असताना पत्रकाराने याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी तुमची मला पाहण्याची ईच्छा आहे का? हो असेल तर साहेबांना सांगा असं म्हणत त्यांनी यावर स्पष्ट बोलणं टाळलं आहे. दरम्यान वरळी मध्ये मनसे कडून संदीप देशपांडे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.
राज ठाकरेंनी मनसे पक्ष हा स्वत:च्या हिंमतीवर आणि मेहनतीवर काढला. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला तरी त्यामध्ये त्यांची मेहनत आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मनसेचा उत्साह वाढलेला दिसेल आणि हा लीड वर नाही तर राज ठाकरेंकडे बघून वाढेल असेही असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.