महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) सध्या कात टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच पक्षाने नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी दिली आहे. थेटच सांगायचे तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे मनसे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अमित ठाकरे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधत अमत ठाकरे यांच्या खांद्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठी अस्मिता आणि मराठी भाषेचा अग्रह धरणाऱ्या मनसेने पदार्पणात मोठे यश मिळवले खरे. पण पुढे या यशात कोणत्याही प्रकारचे सातत्य दिसले नाही. उलट मनसेला मोठी ओहोटीच लागली. त्यामुळे अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेना किंवा इतर कोणत्यातरी पक्षांमध्ये प्रवेश केला. मनसेच्या विद्यार्थी संघटनांच्या बाबतीतही असेच पाहायला मिळाले. (हेही वाचा, Pune: राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान दांपत्यांनी त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा केला आग्रह, मनसे अध्यक्षांनी ठेवले 'हे' नाव (Video))
मनापासून अभिनंदन pic.twitter.com/MvsFn3yn2d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 27, 2022
पाठिमागील काही वर्षांमध्ये मनसेला लागलेली घरघर पाहता मराठी युवकांना पुन्हा मनसेकडे वळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यातूनच अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी संघटनांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि संस्कृती यांबाबत अग्रही भूमिका मांडली. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर जोरदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.