महाविकास आघाडीच्या अडीज वर्षांच्या संसारानंतर आता त्यामध्ये फूट पडली आहे. 50 च्या आसपास आमदार बाहेर पडल्याने आता राज्य सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा स्वतंत्र गट 11 जुलै पर्यंत शिवसेनेकडून आलेल्या अपात्रतेच्या कारवाईपासून सुरक्षित झाला आहे पण आता पुढे या गटाला इतरत्र विलीन होण्याची वेळ आल्यास काय होणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. शिंदेगटाकडे सध्या मनसे (MNS) चा देखील पर्याय असल्याने शिंदेगट-मनसे युतीची देखील शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान काल महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची फोन वरून चर्चा झाल्याच्या बातमीला मनसे नेत्यांनी दुजोरा दिला आहे. काल शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई दाखल झाल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामध्येच आता मनसे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांचं ट्वीट या राजकीय गरमा गरमी मध्ये चर्चेत आलं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Political Crisis: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे देणार होते राजीनामा? मात्र शरद पवारांनी रोखले .
अमेय खोपकर ट्वीट
असा हा ‘धर्मवीर’…
एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे.
पिक्चर अभी बाकी है
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 27, 2022
अमेय खोपकरांनी केलेल्या ट्वीट मध्ये आज एका मोठ्या घोषणेची शक्यता आहे. असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधील बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक, निष्ठावंतांपैकी एक समजले जात असे. आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बाहेर पडले आहेत. या बंडखोर आमदारांनी दिलेल्या कारणांमध्ये त्यांना कॉंग्रेस, एनसीपी सोबतची युती रूचलेली नाही. एनसीपी खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच हिंदुत्त्वाचा मुद्दा देखील त्यांनी अधोरेखित केला आहे.