देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (Archived, edited, images)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Elections)  येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर आता सारेच पक्ष कामाला लागले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये लवकरच शिवसेना- भाजपा युतीची घोषणा केली जाईल तसेच नारायण राणे यांचा भाजपा पक्षप्रवेश याबाबत माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी युतीबद्दल लवकरच घोषणा केली जाईल तसेच नारायण राणे यांच्या भाजपा पक्षप्रवेशाबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. तसेच आज त्यांनी अर्थमंत्रालयाकडून कॉरपरेट टॅक्समध्ये कपात केल्याचे निर्णयाचंदेखील स्वागत केलं आहे.

महराष्ट्रात आता निवडणूकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना -भाजपाकडून अद्याप युतीची आणि जागावाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ती लवकरच केली, थोडी वाट पहावी लागेल असं सूचक वक्तव्य आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सध्या जागा वाटपाच्या विविध फॉर्म्युल्यांचे गणित दोन्ही पक्षांकडून केले जात. सुरूवातीला 50-50 जागावाटपाची भाषा करणारी शिवसेना येत्या निवडणूकींमध्ये 'एकला चलो'चा नारा देणार की भाजपा सोबत वाटाघाटी करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासोबतच नारायण राणे भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार का? या प्रश्नावरही थेट उत्तर देणं फडणवीसांनी टाळलं. Maharashtra Assembly Elections 2019: भाजप सोबत युती करणार, पुढील दोन दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील राजकारणासोबतच सध्या देशात निर्मला सीतारमण यांनी टॅक्स दरात कपात केल्याने उद्योग जगताला दिलासा मिळाल्याचं म्हणत फडणवीसांनी मोदी सरकार आणि निर्मला सीतारमण यांचे आभार मानले आहेत. सोबतच बॅंकांचे विलीनीकरण, गृहकर्जावर सूट या सरकारच्या निर्णयाचेही स्वागत केले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हब येईल याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.