कोरोना व्हायरसच्या संकटकाळात रुग्णांची लूट, अवघ्या 10 किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेसाठी आकारले जातायत तब्बल 10 हजार
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात रुग्णंकडून विविध तक्रारी समोर येत आहेत. तर रुग्णंकडून रुग्णवाहिकेसाठी अवघ्या 10-15 किमी अंतरासाठी तब्बल 10 हजार रुपये उकळले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दरम्यान, काही राज्यात रुग्णवाहिकेच्या या कारभाराच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. आता सुद्धा रुग्णांकडून हजारो रुपये उकळले जात असल्यचे प्रकार सुरुच आहेत. तर काही दिवसांपूर्वी जेव्हा कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत होता त्यावेळी रुग्णंकडून 10 किमीसाठी 30 हजार रुपये वसूल केल्याची तक्रार समोर आल्या आहेत.

अखेर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी दखल घ्यावी लागली होती. जून महिन्याच्या शेवटच्या महिन्यात पुण्यातील एका कोविडच्या रुग्णाला शहरातच 7 किमी अंतरासाठी 8 हजार रुपये रुग्णवाहिकेसाठी चार्ज करण्यात आले होते. अशा पद्धतीच्या तक्रारी अन्य राज्यांकडून सुद्धा आल्या आहेत. बंगळुरुत तर एका मुलाने त्याच्या आईला 6 किमीसाठी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तब्बल 15 हजार रुपये दिले होते. रुग्णांची ही लूट फक्त 20-25 टक्क्यांहून अधिक वसूल केली जात आहे. ऐवढेच नाह तर खासगी रुग्णवाहिका, हेल्पर, पीपीई किट आणि रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरणासाठी अतिरिक्त 3 हजार रुपये सुद्धा आकारले जातात.(ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी महापालिका विभागातील कंटेनमेंट झोन मध्ये आज पासून 31 जुलै पर्यंत Lockdown)

दरम्यान, काही राज्यात रुग्णवाहिकेच्या अभावी कोविड रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. तसेच काही राज्यातील रुग्णवाहिका मालकांनी त्याचे दर दुप्पट तिप्पट वाढवले आहेत. कोरोना व्हायरसच्या पूर्वी झारखंड आणि उत्तर प्रदेशातील रुग्णवाहिका मालकांनी प्रति किमीसाठी 10 हजार रुपये वसूल केले जात होते. मात्र आता तेच दर त्यांनी 13 हजारांवर नेले आहेत. असा सगळा रुग्णाहिकेचा भोंगळ कारभार सुरु आहेच. पण साधा ताप, सर्दी अशी लक्षणे दिसून आली तरीही मनमानी करत अतिरिक्त चार्ज वसूल करत आहेत.