मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहरातील लोकांची जीवनवाहिनी आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी लोकलने प्रवास करीत असतात. याआधी अनेकदा लोकलच्या दारात स्टंट होत असल्याचा घटना समोर आल्या आहेत. आता रेल्वेच्या दारात लटकून केलेल्या प्रवासामुळे एक मोठा अपघात घडाला आहे. रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करत असता रूळावरील खांबावर डोके आपटून, धडापासून डोके वेगळे झाल्याची घटना अंबरनाथ (Ambernath) येथे घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेले शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री वाजता अंबरनाथ स्टेशनवर लोकल आली. त्यावेळी स्टेशन मास्तरांना लगेजच्या डब्यात शरीर नसलेले डोके आढळले. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी हे शिर ताब्यात घेऊन त्याच्या धडाचा तपास सुरु केला. श्वान पथकाच्या मदतीने पोलीस या व्यक्तीच्या शरीराचा शोध घेत होते. अखेर उल्हासनगर आणि अंबरनाथच्यामधे या व्यक्तीचे शरीर आढळले. हितेंद्र राजभर असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.
जितेंद्रने रात्री उल्हासनगर येथून अंबरनाथला जाणारी लोकल पकडली होती. प्रवासामध्ये तो दरवाज्यात उभा होता. यादरम्यान त्याचे डोके रूळावरील खांबावर धडकले. रेल्वेच्या वेगामुळे ही धडक इतकी मोठी ठरली की त्याचे डोके धडापासून वेगळे झाले व डब्यात पडले. या प्रकरणी आणि जीआरपीचे एसीपी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. यानंतर हा घातपात नसून अपघातच असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: Coronavirus in Maharashtra: घाबरु नका पण काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टिव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात)
दरम्यान, कोरोनामुळे अनेक दिवस मुंबई लोकल बंद होत्या व अनलॉकनंतर त्या पुन्हा सुरु झाल्या. लोकल सुरु झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी दिसून आली होती. गोष्टीचे गांभीर्य पाहता प्रशासनाने तरुणांवर योग्य ती कारवाई केली होती.