Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2021: महापरिनिर्वान दिनी चैत्यभूमीवर उपस्थित राहता येणार असले तरी जिथे असाल तेथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, महापौर किशोरी पेडणेकर यांचे अवाहन
Dadar Chaitybhumi (Photo Credit - Wikimedia Commons)

ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Govt) खबरदारी म्हणून चैत्यभूमीवरील व्यवस्थेबाबत महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. तेव्हा 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) 2021 दादर, चैत्यभूमीवर सर्व नागरिकांना अभिवादन करता येणार आहे असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटले आहे. मात्र, या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यासह कोरोना महामारीच्या आजाराचा धोका लक्षात मुंबई आणि जवळपासच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही महापौरांनी केले. मुंबई आणि जवळपास नागरिकांना चैत्यभूमीवर कधीही येता येईल. मात्र, बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे महापौरांनी म्हटले.

वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच दादर, चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी घरी राहूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे. अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. किटकनाशक फवारणीदेखील करण्यात येणार असून अप्रिय घटना घडल्यास नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अग्निशमन दल, अतिदक्षता रुग्णवाहिका, लाइफ गार्डस तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हे ही वाचा Omicron: दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह; किशोरी पेडणेकर यांची माहिती.)

महापरिनिर्वाणदिनी मुंबईला येणं टाळा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संकट घोंगावत आहे. त्याचा अंदाज कोणालाही येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांनी मुंबईला न येता जिथे असेल तिथून बाबासाहेबांना मानवंदना द्यावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.