Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

पुणे जिल्ह्यातील (Pune) कोरोना रुग्णसंख्या मध्ये घट होताना दिसुन येत (Pune Corona Cases) आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील सर्व शाळा पहिली ते आठवी आणि महाविद्यालय पूर्ण वेळ सुरु राहणार (Schools Reopen In Pune) असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यापुर्वी, मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आल्या होत्या. यात पहिली ते आठवी तील शाळा फक्त चार तास सुरू होती. तर नववी नंतर शाळा ही पूर्णवेळ सुरू करण्यात आली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांत घट झाली आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय पुर्णवेळ सुरु होतील.

Tweet

दोन दिवस लसीकरण बंद

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी जेवढी लस पाहिजे तेवढी नाही. आजही लसीकरण झालं नाही. उद्याही होणार नाही. सोमवारी लस मिळेल. मुंबईला गेल्यावर केंद्राशी संपर्क साधून लस मिळवण्याचा प्रयत्न करतो. कोविड सेंटर बंद आहे. त्याला भाडं द्यावं लागत आहे. मात्र, 28 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहून मार्चमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं ठरलं आहे.

पुण्यात अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण

पुण्यातील कोरोना संपला असे अद्याप म्हणता येणार  नाही.  कारण अजूनही 45 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे एकदोन आठवड्यांनंतर निर्बंधांबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले. पालघरमधील वृक्षतोडीच्या घटनेची सविस्तर माहिती घेतली जाईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याबाबत खुप आग्रही असल्याचे अजित पवार म्हणाले. (हे ही वाचा Mumbai: दोन वर्षाच्या मुलीची वडिलांकडून हत्या, आरोपीला बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

येरवडा दुर्घटनेतील मृत्युमुखी नातेवाईकांना पाच लाखांची मदत

पुण्यातील येरवडा भागातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देखील या अपघाताबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे पवार म्हणाले.