BMC Vaccination Update: मुंबईत सर्व सरकारी कोरोना लसीकरण केंद्र 2 दिवस बंद राहणार
Vaccination. (Photo Credits: PTI)

BMC Vaccination Update: मुंबईत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बीएमसी (BMC) आणि सरकारी कोरोना लसीकरण केंद्रात (Government Vaccinations Centers) आज म्हणजेच शनिवारी 2 एप्रिल आणि रविवारी 2 एप्रिल रोजी लसीकरण होणार नाही. यासंदर्भात माहिती देताना बीएमसीने सांगितले की, 4 एप्रिलपासून सर्व केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू होईल.

दरम्यान, शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 123 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचबरोबर या संसर्गामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील बाधितांची संख्या आता 78,74,147 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,47,785 वर पोहोचली आहे. (हेही वाचा - Aaditya Thackeray On Political Pollution: राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का? पत्रकारांच्या गुगलीवर आदित्य ठाकरे यांचा षटकार  'थ्री व्हीलरचं चांगलं चालू आहे')

याशिवाय एका दिवसात देशात कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराची 1,260 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,30,27,035 वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 13,445 वर आली आहे. (हेही वाचा - कोरोना पुन्हा वाढणार टेन्शन! नवीन XE प्रकार Omicron BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य; WHO चा दावा)

त्याचवेळी, देशव्यापी अँटी-कोविड-19 मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 184.52 कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी होत आहे. मात्र, अनेक देशांमध्ये ऑमिक्रॉनचे नवीन व्हेरिएंट आढळून येत आहे. यातील काही व्हेरिएंटची लक्षणे सौम्य तर काहींची लक्षणे तीव्र स्वरुपाची आहेत. जागतिक आरोग्य संघटना यासंदर्भात वारंवार अपडेट देत असते.