राज्याचे पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुणे येथे पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी तडाखेबाज उत्तरे दिली. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत. हाच धाका पकडत प्रसारमाध्यमांनी राज्यात राजकीय प्रदुषण (Political Pollution) वाढले आहे का? असा खोचक प्रश्न विचारला. यावर बोलताना ''थ्री व्हीलर'चं चांगलं चालू आहे' असे भन्नाट उत्तर दिले. आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अनेकदा अडचणीचे प्रश्न विचारतात. परंतू, आदित्य ठाकरे शक्यतो वाद निर्माण होणार नाही, कोणावर कारणाशिवाय तीव्र शब्दांत टीका होणार नाही याची दक्षता घेत उत्तरे देत असतात. प्रसारमाध्यमांसोबतच्या आजच्या संवादातही असेच काहीसे पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे यांनी पर्यायी इंधन प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाध साधताना म्हटले, ऑटोमोबाईल हे पुणे शहराची ओळख आहे. त्यामुळे पुणेकरांनी या प्रदर्शनास अधिकाधिक प्रतिसाद द्यावा. इथे आलेल्या नागरिकांना अधिक चांगले प्रर्याय मिळतील. खास करुन ज्यांना इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन विशेष ठरेन. आगामी काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन पाहायला मिळतील, असेही आदित्य या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Marathi Bhasha Bhavan: मराठी भाषेवर बोलण्यापेक्षा मराठीत बोला, दररोजच्या टीकेला मी किंमत देत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला)
पुढच्या काही काळात महाराष्ट्रामध्येही स्क्रॅपींग पॉलिसीही राबवली जाईल. त्यामुळे राज्यात नागरिकांना पर्यायी इंधने कुठे उपलब्ध होईल यावरही राज्य सरकार विचार करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या सगळ्यात पुणे हे मुख्य केंद्र आहे. इतर ठिकाणे त्यांना फॉलो करतील, असेही ते म्हणाले.