Akshay Tritiya 2019: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीये (Akshay Tritiya) दिवशी अनेकजण सोनं खरेदी करणं शुभ मानतात. या दिवशी लहानसं का होईना पण सोन्याचं काही विकत घेणं शुभ असल्याचं म्हटलं जातं. पण बाजारात सोन्याचे दर(Gold Rate) नेहमीच वर खाली होत असतात. सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने सोने खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. मग पहा आज मुंबईत सोन्याचा भाव काय आहे? Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याऐवजी 'या' गोष्टी खरेदी करा, आयुष्यात धनसंपत्ती आणि सुख-शांती लाभेल
मुंबईत सोन्याचे भाव काय?
मुंबईत आज (30 एप्रिल) दिवशी सोन्याचा दर 1 तोळ्यामागे सुमारे 31,400 इतका आहे. हा दर 22 कॅरेट सोन्याचा आहे. आजकाल सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. (Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)
सोन्याचा बाजारभावातील दर आणि सराफाच्या दुकानातील दर वेगवेगळा आहे. यामध्ये टॅक्सचादेखील समावेश होतो. त्यामुळे बाजारभावापेक्षा तुम्हांला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील.
(सोन्याचे दर हे Goodreturns.in वेबसाईटच्या माहितीनुसार देण्यात आला आहे.)