अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण: खासदार अमोल कोल्हे यांनी दिली प्रतिक्रिया; उदयनराजे भोसले यांनीही सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
Akshay Borhade attack Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Akshay Borhade Attack Case: अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) नामक युवकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरस झाला आहे. या व्हिडिओत या युवकाने जुन्नर येथील एका बड्या राजकीय नेत्याने आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे. शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याबद्दल आपल्याला मारहाण झाल्याचेही या युवकाचे म्हणने आहे. दरम्यान, या कथीत घटनेवरुन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेतील भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून या घटनेचा निधेष नोंदवला आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनीही या प्रकरणात आपले मत व्यक्त केले आहे. खासदार डॉ. कोल्हे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपली भूमिका मांडली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'जय शिवराय! काल सोशल मिडीयावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओ वर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. या प्रकरणाची योग्य ती चौकशी सुरू आहे. विनंती आहे की पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं. कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा!' (हेही वाचा, महाराष्ट्र पोलिस कर्मचार्‍यांना COVID 19 ची लागण होण्याच्या संख्येत मोठी वाढ; 24 तासांत 131 जणांना कोरोनाची लागण!)

खा. डॉ. अमोल कोल्हे व्हिडिओ

खा. उदयनराजे भोसले फेसबुक पोस्ट

अक्षय बोऱ्हाडे नामक फेसबुक अकाऊंटवरील व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

अक्षय बोऱ्हाडे नामक एका युवकाने फेसबुक लाईव्हद्वारे दावा केला आहे की, जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी त्याला मारहाण केली. या व्हिडिओत हा तरुण सांगताना दिसतो की, गेली 3 वर्षे मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम केलं, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझं कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असं वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा. मोठी मोठी दांडकी घेऊन मला मारहाण केली, असाही दावा या तरुणाने या व्हिडिओ केला आहे.