Barshitakli, Zilla Parishad School: अकोला जिल्हा परिषदेच्या शाळेत (Akola ZP School) धक्कादायक कृत्य घडल्याचे वृत्त आहे. या शाळेती दोन शिक्षकांनी चार मुलींसबत अश्लिल वर्तन करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची पुढे आले आहे. पीडित विद्यार्थीनी शाळेत गेल्या नाहीत. पालकांनी विचारले असता त्यांनी शाळेत जायला नकार दिला. परिणामी पालिकांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पीडित मुली इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतात असे समजते.बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या धामणदारी येथील एका शाळेत हा प्रकार घडला. शिक्षकांविरोधात तालुका पोलिसस्टेशन दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे.
सुधाकर ढगे आणि राजेश तायडे अशी या दोन शिक्षकांची नावे आहेत. लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या या दोन्ही शिक्षकांना अद्याप अटक झाली आहे किंवा नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनींसोबत शिक्षक सातत्याने अश्लील चाळे करत असत. विद्यार्थीनींना एकटे गाटून किंवा बोलवून ते त्यांच्याशी लगट करत असायचे. त्यामुळे विद्यार्थीनिंच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली. परिणामी त्यांनी शाळेत जाणे बंद केले. (हेही वाचा, Sexual Abuse By Step Father: अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मुलीचा ताबा आजीकडे सोवण्यास हायकोर्टाची परवानगी)
आपल्या मुली शाळेत जायला टाळाटाळ करतात. काहीशा घाबरलेल्या असतात. त्यामुळे पालकांना संशय आला. पालकांनी विश्वासात घेऊन मुलींकडे विचारपूस केली असता त्यांनी शाळेत न जाण्याचे कारण सांगितले. त्यानंतर विद्यार्थीनींनी आपल्या पालकांना घडल्या प्रकारबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनीनी सांगितलेला प्रकार ऐकून पालकांना धक्का बसला. त्यांच्याही मनात संतापाची लाट निर्माण झाली. पालकांनी थेट पोलिस्टेशन गाठले आणि संबंधित शिक्षकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंदवला.पुढील तपास सुरु आहे.