Nylon Manja (Photo Credit: Twitter)

जानेवारी महिना आला की न्यू इयर सेलिब्रेशन नंतर सगळ्यांना उत्सुकता असते ती म्हणजे संक्रांतीचा सण आणि पतंगबाजीची! पण अकोलामध्ये या पतंगबाजीचा मांजा जीवावर बेतला असता. आईसोबल टू व्हिलर वरून जाणार्‍या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा मांज्याने चिरला गेला. दरम्यान जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये तातडीचे उपचार मिळाले आणि शस्त्रक्रियेने त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दरम्यान ही घटना अकोला शहरातील डाबकी रोड वरील आश्रय नगर भागातील आहे.

साडेतीन वर्षीय वीर उजाडे आपल्या आईसोबत 26 डिसेंबरला संध्याकाळच्या 5 च्या सुमारास निघाला होता. गाडीवर असताना अचानक नायलॉन मांज्यामुळे त्याच्या गळ्याला सुमारे चार इंच खोल जखम झाली. वीर रक्ताने ओथंबला. आईने वीरची अवस्था पाहून तातडीने त्याला दवाखान्यात नेले. पण वीरची अवस्था पाहून लगेजच त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आणि पुढील उपचार झाले. वीर ला वाचवण्यासाठी त्याच्यावर 2 तासांची शस्त्रक्रिया झाली.

अकोलामध्ये नायलॉन मांज्यावर बंदी असूनही विक्री होत असल्याने दुखापतीच्या घटना वाढल्या आहे. हा मांजा जीवावर बेतू शकतो. माणसांप्रमाणेच अनेक पक्ष्यांचे जीव यामुळे जात असल्याने त्याचा वापर आणि विक्री टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: Mumbai: मुंबईत नायलॉनच्या मांजामुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गळा; थोडक्यात बचावले .

महाराष्ट्रात राज्य सरकारने 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5  अन्वये मांजाची विक्री आणि  वापरावर बंदी  आणली आहे. बंदी असूनही चिनी व नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे यावरून दिसत आहे.