Ajit Pawar On Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची (Koyta Gang in Pune) फार मोठी दहशत आहे. कोयता गँगकडून आजपर्यंत अनेकांवर हल्ले झाले आहेत. वाहनांची प्रचंड तोडफोडही झाली जाते. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुफडा साफ करणार असल्याचं, आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर या कोयता गॅंगमध्ये (Koyta Gang)लहान मुले, तरूणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यावरही चिंता व्यक्त केली आहे. ती मुले हाताबाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर योग्य वेळी लक्ष द्यावे, असे देखील अजित पवार यांनी म्हचले आहे. अन्यथा त्यांना टायमध्ये टाकण्यात येईल असा सज्जड दमही अजित पवार यांनी पालकवर्गाला दिला आहे. (हेही वाचा: Pune: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! 17 वर्षीय तरुणाची हत्या; हडपसर येथील घटना, आरोपींना अटक )
“कसली कोयता गँग रे? या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. ते पोरगं कितीही मोठ्या बापाचं असलं तरीसुद्धा आता काही चालणार नाही. काही लोकं म्हणतात की आता चूक झाली पदरात घ्या. आता पदर फाटला. पदर नाही, धोतर नाही आता डायरेक्ट टायरमध्ये,’’ असं अजित पवार बेधडकपणे म्हणाले. (हेही वाचा: Pune Crime News: इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करून तरुणाचा खून, गणेश पेठेतील थरारक घटना )
१२-१५ वर्षांची मुले हातात कोयता, तलवारी घेऊन फिरतायत. अशी मुले अढळल्यास या मुलांच्या आई-वडिलांना बोलविणार आहे. आई-वडिलांनी आपल्या कार्ट्यांना नीट वागायला शिकविले पाहिजे. आई-वडिलांना आपल्या मुलामुलीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? ते काय करतात, हे माहित असायला पाहिजे. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरी मुलाहिजा ठेवणार नाही. विश्रांतवाडीत परवा जी घटना घडली, त्यातील मुलांना हुडकून काढतो. पुणे विद्येचे माहेरघर आहे. या प्रतिष्ठेला कमीपणा येईल, असे वागू नका,’’ असे अजित पवार म्हणाले.