Pune Crime News: इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करून तरुणाचा खून, गणेश पेठेतील थरारक घटना
पुणे (Pune) शहरात गेल्या काही महिन्यापासून कोयता गॅंगच्या (Koyta Gang) दहशतीत वाढ होत असल्याने नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
Pune Crime News: पुणे (Pune) शहरात गेल्या काही महिन्यापासून कोयता गॅंगच्या (Koyta Gang) दहशतीत वाढ होत असल्याने नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पोलिसांच्या सुरक्षतेत देखील कोयता गॅंग थांबायची नाव घेत नाही. दरम्यान पुन्हा एकदा पुण्यात तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री इमारतीच्या छतावर तरुणाचा कोयत्याने सपासप वार करत खून केला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गणेश पेठेत रविवारी मध्यरात्री ही गुन्हा घडला. तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करत खून केला आहे. किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करत खून केल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. इमारतीच्या छतावर तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करत तरुणाचा खून केला आहे.
नेमकं काय घडलं?
सिध्दार्थ नंदकुमार हादगे असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री गुन्हा घडला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेअंतर्गत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपी आणि सिध्दार्थ यांच्यात वाद झाला होता. किरकोळ गोष्टींमुळे भांडण झाले त्यानंतर आरोपी कोयता घेऊन त्याच्या मागे लागला. सिध्दार्थ जीव वाचवण्यासाठी पळत ओसवाल बिल्डींगच्या छतावर गेला असता आरोपी देखील त्याच्या पाठी आला आणि त्याच्यावर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2023 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

