Ahmednagar Shocker: अहमदनगर मध्ये घराचा वाद माय-लेकाच्या जीवावर बेतला; अडीज वर्षाच्या मुलाच्या अंगावरून नेली भरधाव गाडी
Dead-pixabay

घराच्या जागेवरून सुरू वाद माय-लेकाच्या जीवावर बेतला आहे. शेजार्‍यांसोबत जागेवरून वाद झाल्याच्या रागात त्यांच्या अंगावरून कार नेत हत्या करण्यात आल्याचा सुन्न प्रकार घडला आहे. शितल येनारे आणि स्वराज येनारे अशी मृतांची नावं असून आरोपी सध्या गायब आहेत. याप्रकरणी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतामध्ये अडीज वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मायलेकाच्या केलेल्या या निर्घुण हत्येनंतर अहमदनगर हादरले आहे.

अहमदनरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये येनारे कुटुंब राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर त्यांच्या शेजारी राहत होता. घराच्या शेजारी जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले होते. या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याची आरोप येनारे कुटुंबाचा आहे. गुरूवार 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात गाडी आणून त्याने शितल आणि स्वराज यांच्या अंगावर घातली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरामध्ये खळबळ पसरली आहे. नक्की वाचा: Ahmednagar Crime: अहमदनगरमध्ये चोरट्यांची दहशत, मेडिकल फोडून २५ हजार रोकड घेऊन फरार .

मृत महिलेची सासू चंद्रकला येनारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खूनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.