Five Die In Bid To Save Cat: मांजरप्रेम अंगाशी; भूतदया दाखवताना अख्ख कुटुंब ठार; बायोगॅसच्या खड्ड्यात 5 जणांचा गुदमरुन मृत्यू

अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मांजरीला वाचवताना (Cat Rescue) पाच जणांचा विहीरीत बनवलेल्या शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे.  बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण बुडाले होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे. विहिरीतील विषारी वायूने गुदमरून पाच जणांचा मृत्यू आहे.  अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.   या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली होती. (हेही वाचा - Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमध्ये भीषण रस्ते अपघात; कंपनीच्या कर्मचाऱ्यांची बस खाणीत पडल्याने 11 जणांचा मृत्यू, 20 जखमी, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक)

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये 9 एप्रिल रोजी घडली होती. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली. गावकऱ्यांनी शोष खड्ड्यात बुडालेल्या एकाला बाहेर काढलं होतं. त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. त्या व्यक्तीला उपचारासाठी नेवासा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.  ही व्यक्ती बायोगॅसच्या खड्ड्यात असलेल्या गॅसमुळे चक्कर येऊन बुडाल्याची माहिती मिळत आहे. अन्य ५ जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.

या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून नेमका हा सगळा प्रकार कसा घडला हे तपासानंतर समोर येईल. माणिक गोविंद काळे,  संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. काल रात्री चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एकाला वाचवण्यात यश आले.