अहमदनगर: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; शेतात नेऊन जाळला मृतदेह
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यात एकरुखे या गावी चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, इतकंच नव्हे तर, खून केल्यावर या पतीने शेतात हा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे सुद्धा समजत आहे, पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी सुनील लेंडे (Sunil Lende) हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. यानंतर लेंडे विरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली

पोलिसांच्या माहितीनुसार, सुनील लेंडे हा पत्नी छाया लेंडे हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शनिवारी संध्याकाळी शेतात गेल्यानंतर सुनील याने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिला जखमी केले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह शेतात ठेवून तो घरी आला. यावेळी पत्नीच्या नातेवाइकाचे निधन झाले असून, ती माहेरी गेली असल्याचे सुनीलने आपल्या आई-वडिलांना सांगितले. आणि मग मुलांना आई-वडिलांसोबत पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. दरम्यान, रात्री एक पोते व पेट्रोल नेऊन पत्नीला शेतापासून जवळच अंतरावर जाळून टाकले. त्यानंतर स्वतःहून तो राहाता पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले. सुनील याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, छाया हिचा भाऊ सुनील तरस याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक आली, अशी माहिती राहाता पोलिसांनी दिली आहे, यापूर्वी उत्तर प्रदेशात सुद्धा अशाच संशयातून एका माथेफिरू पोलिसाने आपल्या पत्नीचा शिरच्छेद करून चक्क त्या मुंडक्यासोबत पोलीस स्टेशन गाठल्याचा प्रकार घडला होता.