अहमदनगर: माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह 10 जणांविरोधात बलात्कार, मारहाणीचा गुन्हा दाखल
(Image used for representational purpose)

अहमदनगर (Ahmednagar) येथील माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह 10 जणांविरोधात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी महापौरांवर लावण्यात आलेल्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. तसेच एका महिलेने जमिनीच्या वादातून पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुरुडगाव मधील आदिवासी समाजातील पीडित महिला बकऱ्या चरायला शेतात घेऊन गेली होती. त्यावेळी फुलसौंदर यांच्यासन काही लोकांनी तिचा रस्ता अडवला. त्यावेळी जमिनीचा वाद मिवटून टाकूया अशी विचारणी केली. मात्र दोघांमध्ये वाद झाल्याने तिला मारहाण करण्यात आली.(पंढरपुर: अल्पवयीन मुलीला दारु पाजून चार नराधमांनी केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

या प्रकारानंतर पीडित महिलेने तातडीने पोलिसात धाव घेत माजी महापौर फुलसौंदर यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या व्यक्तींनी माझ्यावर बलात्कार केला असल्याचे ही महिलेने पोलिसांना सांगितले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आता परिसरात महापौरांचे नाव पुढे आल्याने चर्चा सुरु झाली आहे.