 
                                                                 Extra Marital Relationship: अहमदनगर जिल्ह्यातून (Ahmednagar News) धक्कादायक वृत्त हाती येत आहे. जिल्ह्यातील कोपरगाव शहरात चक्क एका चुलत्याने आपल्या पुतणीवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिची हत्या केली आहे. धक्कादायक असे की, या चुलत्याचे म्हणजेच काकाचे चक्क त्या पुतणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. वयवर्षे 21 असलेली ही पुतणी विवाहीत होती. काही कारणांमुळे ती माहेरी आली होती आणि मध्यरात्रीच्या सुमारास ती एका तरुणासोबत बोलत होती. कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, घटना बुधवारी (18 ऑक्टोबर) रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली.
माहेरी आलेली पुतणी बरेच दिवस सासरी गेली नव्हती. त्यामुळे ती माहेरीच राहात होती. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ती एका मुलासोबत बोलत होती. ती त्या मुलासोबत बोलत असल्याचे पाहून काकाला प्रचंड राग आला. त्यातून त्याने तिला जाब विचारण्यास सुरुवात केले. तिच्यावर संशय व्यक्त करत त्याने अनेक आरोप केले. त्यातून काहीसा वाद वाढला आणि त्याने चक्क घरातील कुऱ्हाडीने तिच्यावर घाव घातले. रागाच्या भरात त्याने केलेल्या हल्ल्यात तिचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला. (हेही वाचा, Love Across Borders: नवरा सोडला, देशही बदलला; नेपाळी महिलेला बिहारी आवडला, त्याने 'केसाने गळा कापला')
हल्ला आणि जखमेने झालेल्या वेदनेमुळे पुतणीने जोरदार आरडाओरडा केला. ज्यामुळे नातेवाईक आणि शेजारी गोळा झाले. त्यांनी तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला उपाचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता आरोपी कुऱ्हाड आणि मोबाईल जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या विचारात होता. मात्र, तोवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीहा मृत महिलेचा काका आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समाजामध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातही आरोपी हा पीडितेचा काका असल्याने दोघांमध्ये असलेल्या संबंधांबाबत समाजामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी, त्याच्यावर कडक कारवाई करुन पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
