Ahmednagar: 'अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करा', भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
Gopichand Padalkar | (Photo Credits: Facebook)

अहमदनगर (Ahmednagar) शहराचे नाव बदलू ते अहिल्यानगर (Ahilya Nagar) करा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी याबाबत एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहीले आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा अन्यथा बहुजन समाज आता जागा झाला आहे, असा इशाराही पडळकर यांनी पत्रात दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या, जय मल्हार.' (हेही वाचा, Gopichand Padalkar On MVA: राज्याला जाती-वर्गात का विभागताय? राज्य बहुजन समाजाचे आहे, गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य)

अहमदनगर जिल्ह्यातील चौडी येथे नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये वार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर केला. याच बळाचा वापर करुन पोलिसांनी अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं.शरदचंद्र पवार हे नवाब मलिक यांचे पालनकर्ते आहेत. जे शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार आहेत. पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.