Crime (PC- File Image)

अहमदनगर अकोले तालुक्यात जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एके काळी गाजलेल्या सुगाव महिला हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्याची सुगाव खुर्द येथे घडली. मच्छीन्द्र उर्फ अण्णा मुक्ताजी वैद्य असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या अण्णा वैद्य याच्या घराच्या परिसरात काही वर्षांपूर्वी तीन महिलांचे पुरलेले सांगाडे आढळले होते. सुगावचे हे महिला हत्याकांड राज्यात चांगलेच गाजले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी त्याची या सर्व गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात तो अनेक वर्षे कारागृहात होता. सुटून आल्यानंतर तो एकटाच सुगावमध्ये रहात होता. (हेही वाचा - Beed Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! पैश्याच्या वादावरून सैनिक भावाची केली हत्या; बीड शहर हादरलं)

रविवारी गावातील एका अल्पवयीन मुलीची मृतक अण्णाने छेड काढली तसेच तिच्या घरात घुसून त्या मुलीला बेदम मारहाण केली. मुलीला सोडवू पाहणाऱ्या महिलांनाही दमदाटी केली. या घटनेनेने संतप्त झालेल्या गावातील काही जणांच्या जमावाने नंतर त्याला घरातून ओढत बाहेर काढले व बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर मृतक अण्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी सध्या पोलीस अधिकचा तपास हा करत आहे.