Ahilyabai Holkar Jayanti 2020 निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजेश टोपे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे ट्विटच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!
Ahilyabai Holkar Jayanti 2020 (PC - File Image)

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांची आज 295 वी जयंती. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात त्यांचा जन्म 31 मे इ.स. 1725 रोजी झाला. त्याकाळात स्त्री शिक्षणाला फारचे महत्त्व नसले तरी त्यांच्या वडीलांनी त्यांना लिहण्यावाचण्यास शिकवले होते. पुण्यश्र्लोकी म्हणून अहिल्याबाईंची ओळख आहे. महान शासक, पराक्रमी योद्धा अशी त्यांची ख्याती आहे. विशेष म्हणजे अहिल्याबाईंचे न्यानदान वाख्याण्याजोगे होते. वयाच्या केवळ 8 व्या वर्षी त्यांचा बाजीराव पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला. खंडेराव कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. परंतु, सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पतीच्या निधनानंतर त्यांनी कारभार सांभाळायला सुरूवात केली आणि होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून त्या ओळखल्या जावू लागल्या.

आज अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्विटच्या माध्यमातून अहिल्याबाईंना विनम्र अभिवादन केले आहे. (Ahilyabai Holkar Jayanti 2020: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनातील रोचक गोष्टी)

अहिल्याबाईंच्या चरणी मान्यवरांचे नमन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्विट:

राजेश टोपे ट्विट:

सुप्रिया सुळे ट्विटः

अनिल देशमुख ट्विटः

शरद पवार ट्विट:

अहिल्याबाईंचा उल्लेख भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हणून इंग्रजी लेखकांनी केला आहे. अहिल्याबाईंनी जंगलतोड, हुंडा यांना विरोध दर्शवला. तसंच या चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना त्यांनी दंड ठोठवायला सुरुवात केली. अहिल्याबाईंच्या कार्यामुळे त्यांना मृत्यूपश्चात अनेकांनी संताचा दर्जा दिला.