महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अलिबाग मतदार संघातून 'सुभाष पाटील' नावाच्या 5 उमेदवारांनी भरले आमदारकीसाठी अर्ज
Maharashtra Legislative Assembly Election 2019 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरामध्ये प्रत्येक निवडणूकीला वेगवेगळे अनुभव येतात. एकाच नावाच्या दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या मतदार संघातून लढताना आपण पाहिल्या आहेत. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections) मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदार संघातून चक्क एका नावाच्या पाच उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या अलिबागमधून PWP चे विद्यमान आमदार सुभाष पाटील (Subhash Patil)  यांनी काल आपला अर्ज भरला आहे. आता अलिबागमधूनच सुभाष लक्ष्मण पाटील, सुभाष जर्नादन पाटील, सुभाष गंगाराम पाटील आणि सुभाष दामोदर पाटील अशा चौघा अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत. Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Date: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‌तारीख जाहीर; 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी

सुभाष प्रभाकर पाटील यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना अशा प्रकारे सारख्या नावांचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणं हा प्रकार गलिच्छ निवडणूकीचा एक प्रकार असल्याचं म्हटलं आहे. मात्र याकडे मी फारसं लक्ष देत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सध्याचे विद्यमान आमदार सुभाष पाटील यांनी हा प्रकार मला हरवण्यासाठी विरोधकांचा राजकीय डाव आहे. यासाठी कोणत्याच विशिष्ट पक्षाला, व्यक्तीला माझा विरोध नाही. मला निवडणूकीत हरवण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्या मतदारांना माझं नावं, निवडणूक चिन्ह माहित आहे. ते मी पुन्हा मतदारांना प्रचाराच्या वेळेस सांगेन.

अलिबाग विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण PWP हा पक्ष कॉंग्रेस-एनसीपी सोबत जाणार आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यानही सुनील तटकरे यांना देखील सारख्याच नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांचं आव्हान होतं.