Results 2019

लोकसभा निवडणूक निकाल 2019 हाती आले आहेत. एनडीए सरकारच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. आता महाराष्ट्रामध्ये एसएससी आणि एचएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकालाच्या तारखेचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या कामकाजामध्ये शिक्षकांना इलेक्शन ड्युडीची कामं असल्याने त्याचा परिणाम निकालांवर होईल अशी भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होती. मात्र शिक्षण मंडळाने दिलासा देत दहावी आणि बारावीचे निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत लावले जातील असे सांगितले आहे. (हेही वाचा-अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय)

दहावी बारावी निकाल 2019

शिक्षण मंडळ आणि काही तज्ञांच्या अंदाजानुसार दहावी 2019 चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. अद्याप शिक्षण मंडळाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दहावी, बारावीचा निकाल ऑनलाईन माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे.

कुठे पहाल निकाल ?

  • mahresults.nic.in,
  • maharashtraeducation.com, results.mkcl.org,
  • mahahsscboard.maharashtra.gov.in,
  • mahahsscboard.in

देशामध्ये अनेक राज्यांमध्ये बोर्ड निकाल जाहीर झाले आहेत. त्यासोबतच ICSE आणि CBSE निकालही जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अ‍ॅडमिशन प्रक्रियेमध्ये आरक्षणासोबतच हाय कट ऑफमुळे अ‍ॅडमिशन इच्छित कॉलेजमध्ये मिळणार का? याची धास्तीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात कायम आहे.