EC | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडणार आहे. या मतदानादरम्यान राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार काही गैर प्रकार करून मतदारांना आकर्षित करू नये यासाठी लहान सहान घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक काम करत आहेत. आज (11 ऑक्टोबर) दिवशी निवडणूक आयोगाने भायखळा आणि धारावी विधानसभा मतदार संघामध्ये सुमारे 63 लाख 9 हजार 755 रूपयांची संशयित रोकड जप्त केली आहे. याबाबातची अधिक माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या संशयित रोकडीचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी धारावी मतदार संघामध्ये एका कारमध्ये अशाप्रकारे रोकड जप्त करण्यात आली आहे. मुंबई: निवडणूक आयोगाकडून धारावी विधानसभा मतदारसंघात 8.17 लाख रूपयांची रोकड जप्त.

ANI Tweet 

महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक 2019 साठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.