मुंबई: निवडणूक आयोगाकडून धारावी विधानसभा मतदारसंघात 8.17 लाख रूपयांची रोकड जप्त
Indian Money | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात गैर प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची भरारी पथकं रूजू करण्यात आली आहे. आज (9 ऑक्टोबर) दिवशी निवडणूक आयोगाकडून 8.17 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. धारावी विधानसभा मतदारसंघामध्ये एका कारमध्ये ही रोकड आढळली आहे. सध्या याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

धीरेंद्र छेडा या 42 वर्षीय व्यक्तीच्या कारमध्ये ही रोकड सापडली आहे. धीरेंद्र हे घाटकोपर पूर्व या परिसरातील रहिवासी आहेत. निवडणूक आयोगाकडून धारावी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

ANI Tweet

 

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी सी व्हिजील अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपवर दखलपात्र तक्रारींवर 100 मिनिटांमध्ये कारवाई करण्याला प्राधान्य दिले जाते.मागील 15 दिवसांत सुमारे 107 तक्रारी आल्या असून 51 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात 21 ऑक्टोबर दिवशी निवडणूकीसाठी मतदान होईल तर 24ऑक्टोबरला मतमोजणी आहे.