(Archived, edited, representative images)

Agriculture Produce Market Committee: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एपीएमसी विधेयक (APMC Bill) विधानसभेमध्ये पारीत झाले आहे. हे विधेयक पुढे संयुक्त निवड समितीकडे सोपविण्यात येईल. दरम्यान, एपीएमसी मार्केटबाबतच्या कायद्यात सरकारकडून करण्यात येणाऱ्या बदलाला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध व्यक्त करण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यानी सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. बाजार समिती आवारातील व्यापारही सेसमुक्त करावा तसेच ई-नाम प्रणाली रद्द करावी, अशी व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

हे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री प्राकश मेहता यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्च केली. या वेळी कृषी उत्पन्न बाजीर समितीच्या मुद्द्याावर सरकार गंभीर आहे. त्यामुळे हे विधेयक पुढे संयुक्त निवड समितीकडे पाठवत आहोत. संयुक्त निवड समितीने अभ्यास केल्यावरच या विधेयकाची पुढील वाटचाल सुरु होणार असल्याचे फडणवीस यांनी मेहता यांना सांगितले. या विधेयकावर संयुक्त निवड समिती अभ्यास करेन व व्यापाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढेण, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यन, सरकारने मान्यता दिलेल्या एपीएमसी विधेयकावरून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर माथाडी कामागार नाराज आहेत. त्यामुळे त्यानी संपाचे हत्यार उपसले आहे. कामगारांनी हा संप मागे घ्यवा असे अवाहन सरकारने केले आहे.