'नो शर्ट फ्री बियर' (No Shirt Free Beer) अशी ऑफर देऊन 'अल्कोहोल किल्स कोरोना' (Alcohol Kills Coronavirus) अशी दिशाभूल करणारी जाहीरात दिल्याप्रकरणी नवी मुंबई येथील एका बार विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाम बीच गॅलेरिया मॉलमधील (Palm Beach Galleria Mall) एजेन्ट् जॅक्स (Agent Jack's Bar) असे या बारचे नाव आहे. या बारने केलेल्या जाहीरातीत म्हणले होते की शर्ट न घालता ग्राहक म्हणून येणाऱ्या महिलांना बीअर मोफत दिली जाईल. बारच्या जाहीरातीवर आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशाविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर या बारवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई येथील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारने ही ऑफर दिली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या बारने ऑफर देताना बारने दावा होता की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये अश्लील आणि विचित्र वाटाव्यात अशा प्रकारे जाहीराती केल्या जात आहेत. या बारच्या ऑफरमध्ये 'पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस' आणि महिलांसाठी 'नो शर्ट फ्री बियर' असे म्हटले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा (Bharatiya Janata Yuva Morcha) च्या एका नेत्या म्हटले आहे की, आम्ही या बारविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली होती. हा बार नागरिकांमध्ये दिशाभूल करत होता. (हेही वाचा, No Shirt Free Beer: 'नो शर्ट फ्री बियर' महिलांसाठी खास ऑफर, नवी मुंबई येथील एका बारची जाहीरात; कारवाईची मागणी)
भारतीय जनता युवा मोर्चाचे मयूर ननावरे (Mayur Prakash Nanaware) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले आहे की, नवी मुंबई वाशी येथील पाम बीच मॉल मध्ये असलेल्या ‘एजंट जॅक्स (AGENT JACK'S)’ या बार मालकाने बार मध्ये ग्राहकांने दारू पिव्यावी या उद्देशाने त्यांना आकर्षित करण्यासाठी “ALCOHOL KILLS CORONA” अश्या प्रकारचे चुकीचा संदेश देणारे बॅनरबाजी केली होती. देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीत लोकांना कोरोना लागणापासून बचाव करण्यासाठीचे निर्देशाबद्दल माहिती न देता, बार मालक हा ग्राहकांना कोरोना या आजाराबद्दल चुकीच्या माहितीचे, दिशाभुल करणारे बॅनर लावून दारू पिण्यासाठी आकर्षित करत होता.