नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा (Maha Vikas Aghadi) मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra cabinet expansion) झाला. परंतु, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिंमडळात स्थान दिले नसल्यामुळे ते नाराज आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यावेळी संजय राऊत नाराज नसल्याचे त्यांनी स्वत: प्रसार माध्यमांना सांगितले होते. यातच आज संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्टकरुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळ तिन्ही पक्षातील काही नेत्यांकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये नाराजीचा पडसाद उमटू लागले आहेत. यामध्ये जसे शिवसेनेचे आमदार आहेत, तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनाही मंत्रीपद देण्यात आले नाही. यावरून संजय राऊत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पंरतु, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर मी नाराज नाही, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले होते. मात्र, आज नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे, याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेंट दी हो.. साथ, समय और समर्पण’, असे लिहिलेली ही पोस्ट नक्की संजय राऊतांनी कुणासाठी आणि कुणाला उद्देशून लिहिली असावी, याविषयी चर्चा सरू झाली आहे. हे देखील वाचा-
संजय राऊत यांची फेसबूक पोस्ट-
मागील सरकारमध्ये शिवसेना पक्षाने दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत अशा विधान परिषदेवरील आमदारांना महत्त्वाची खाती दिली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यांसारख्या विधान परिषदेतील ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.