'अवनी' नंतर चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत, शेतकरी मजूर महिलेचा मृत्यू
वाघ (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

नरभक्षक अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आता 'अवनीं नंतर एका वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. ५५ वर्षीय सखुबाई कस्तुरे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. भाजप सरकारला सत्तेचा माज, अवनी टी-1 वाघिणीच्या हत्येवरुन राज ठाकरे आक्रमक

शुक्रवारी सखुबाई कामासाठी बाहेर पडल्या होत्या. शेतात मजुरीचं काम करणाऱ्या सखुबाई रात्री उशिरापर्यंत घरी पोहचल्या नव्हत्या. शनिवारी सकाळी सखुबाईंच्या घरातील सदस्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस शेतामध्ये सखूबाईंचा मृतदेह आढळला. सखूबाईच्या शरीरावर वाघाच्या नखांचे ओरखडे दिसले.

काही दिवसांपूर्वी अवनी या अशाच नरभक्षक वाघिणीच्या भीतीतून सुटका मिळवण्यासाठी वन खात्याने तिच्यावर गोळीबार करून ठार करण्यात आले. देशभरातून अवनीच्या हत्येवर टीकेचे सूर उमटायला सुरुवात झाली आहे. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार अवनी वाघिणीने 13 गावकऱ्यांचे बळी घेतले होते.