Pune Fraud: सोशल मीडियावरील जाहीरात पाहून स्वस्त कार घेण्यासाठी गेला, पुण्यातील तरुणाची 36 हजारांची फसवणूक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

ई-कॉमर्स साइटवर (E-commerce site) स्वस्त दरात कार विकण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय पुणे येथील रहिवासी तरुणाची 36,400 रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) शनिवारी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारदाराला एक जाहिरात आली. त्यांनी कार मालकाशी संपर्क साधून वाहनात रस दाखवला. अधिका-यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने त्याला कार 50,000 रुपयांमध्ये विकण्याची ऑफर दिली. तक्रारदाराने कार विकत घेण्याचे मान्य केल्यावर आरोपींनी भारतीय लष्कराच्या कुरिअर नावाचे काहीतरी वापरून कार पाठवण्याची ऑफर दिली.

परंतू कुरिअर सेवेचा वापर करण्यासाठी आणि ऑफर केलेल्या किमतीत कार मिळविण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 36,400 रुपये आगाऊ पैसे देण्याची मागणी केली. तक्रारदाराने पैसे पाठवल्यानंतर आरोपीने तक्रारदाराशी संवाद बंद केला. यावर्षी 28 ते 29 मे दरम्यान हे व्यवहार झाले. हेही वाचा Omicron in Maharashtra: महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा कहर; पुण्यात आढळले नवीन 7 रुग्ण, आतापर्यंत 8 प्रकरणांची पुष्टी

भारतीय दंड संहितेच्या कलम 419 व्यक्तिकरण आणि 420 फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण बोत्रे तपास करत आहेत.