Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूकीचा धुराळा सर्वीकडे उडाला आहे. अमरावती खासदार नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. काल सर्वोच्च न्यायालयनं जात प्रमाणपत्र संदर्भात निर्णय दिला. नवनीत राणा यांच जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा निर्णय ऐकल्यानंतर नवनीत राणा यांना आनंदाश्रू आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षात खळबळ उडाली. (हेही वाचा- खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल)
दरम्यान हा निर्णय ऐकून बच्चू कडून यांनी नवनीत राणां यांच्यावर बोचरी टीका केली. 'किती वेळा रडणार, लोकांची सहानुभूती आता संपलीय' असे बच्चू कडू म्हणाले आहेत. जनतेचं उत्तर काही वेगळं असून त्या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत. रडणे म्हणजेत सहानभूती मिळवणे. पण आता ती सहानभूती संपली असून, तुम्ही किती वेळा रडणार आहेत. निवडणुकीत रडणं चांगले नसते. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडल्या असतात तर आम्हाला त्याची कीव वाटली असती. तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर हेच दुर्दैवी आहे. असं बच्चू कडू म्हणाले.
या आधीही बच्चू कडूंनी राणा दामप्त्यांवर बोचरी टीका केली. बच्चू कडून यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली की, प्रचारासाठी २ कोटीच्या गाडीतून फिरायचं आणि १७ रुपयांची साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका.