Mumbai Police (फोटो सौजन्य - ANI)

Lawrence Bishnoi Gang Targeted Pune Leader: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर (NCP leader Baba Siddique Murder) पुण्यातील आणखी एक नेता लॉरेन्स बिश्नोई टोळी (Lawrence Bishnoi Gang)च्या रडारवर होता, असा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नेमबाजांवर हा गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) मोठा खुलासा केला आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा नेता बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याचे मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुण्यातील नेत्यालाही ठार मारण्याचा कट रचला होता. हा गुन्हा घडवण्याची जबाबदारी प्लॅन बी मधील नेमबाजांना देण्यात आली होती, असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा करण्यासाठी वापरले जाणारे पिस्तूल जप्त केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. गुन्हे शाखेने या नेत्याचे नाव उघड केलेले नाही. बिष्णोई टोळीचा प्लॅन उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेने पुणे पोलिसांशी इनपुट आणि माहिती शेअर केली. या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Actor Salman Khan ला पुन्हा Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; 'जिवंत रहायचं असेल तर...' Mumbai Police Traffic Control ला मेसेज)

बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक -

बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी गौरव विलास अपुणे या शूटरला अटक केली. बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने केलेल्या प्लॅन बीमध्ये नेमबाज म्हणून सहभागी असलेला गौरव विलास हा गोळीबाराच्या सरावासाठी झारखंडला गेला होता. ही बाब मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाली आहे. पुढील चौकशीत गौरवने खुलासा केला की, प्लॅन अ अयशस्वी झाल्यास प्लॅन बी बॅकअपसाठी तयार केला होता. (हेही वाचा - Salman Khan Death Threat: 'चूक झाली...'; सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी .)

झारखंडमध्ये करण्यात आला गोळीबाराचा सराव -

याशिवाय, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक रूपेश मोहोळ हाही गोळीबाराचा सराव करण्यासाठी अपुणेसोबत झारखंडला गेला होता. अधिक चौकशीत हत्येचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने मोहोळ आणि अपुणे या दोघांना आवश्यक शस्त्रांसह 28 जुलै रोजी झारखंड येथे सरावासाठी पाठवले होती. दोघांनी झारखंडमध्ये एक दिवस गोळीबाराचा सराव केला होता आणि 29 जुलै रोजी ते पुण्यात परतले. त्यानंतर ते पुन्हा शुभम लोणकरच्या संपर्कात आले. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारीही झारखंडमध्ये गोळीबाराच्या सरावासाठी निवडलेले नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.