नुकताच विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नागरिकांच्या समोर आला आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सर्वात जास्त असल्याचे दिसून आले. तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही विजयाचा आनंद अतिउत्साहाने साजरा केला. परंतु जळगाव येथे एका कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याच्या अतिउत्साहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.
सुरेश ठाकरे असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव असून पारोळा तालुक्यात राहत होते. तसेच सुरेश हे गेली 40 वर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून माजी तालुकाध्यक्षसुद्धा होते. मात्र निकाल लागल्यानंतर तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान यांनी सुरेश यांना हा आनंद साजरा करण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी सुरेश यांना काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या आनंदात तिथेच हृदयविकाराचा झटका आला. या प्रकरणी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता त्यांना धुळ्यातील रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा तिथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(हेही वाचा- BJP च्या आशा मावळल्या; मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्तास्थापनेसाठी मायावतींनी दिला कॉंग्रेसला पाठींबा)
त्यामुळे एका बाजूला काँग्रेस पक्ष विजयी झाल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला निष्ठावंत कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांच्या दु: खद निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.