मुंबईमध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसाचं आगमन झालं आहे. या पावसामुळे मुंबईकरांची उन्हाच्या कडाक्यापासून, पाणी संकटापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरीही पावसाने झोडपल्याने सखल भागात पाणी साचल्याने तुंबई झाली आहे. जून महिन्याच्या सरासरी पाऊस मागील 3 दिवसात झाल्याने काही प्रमानात मुंबईकरांना दिला मिळाला आहे. यामध्ये मुंबईच्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने पाणी पातळी सुधारली आहे.
मुंबईला सात धरणांमधून पाणी पुरवठा होतो. त्यापैकी तुळशी 63% तर विहार 34% भरले आहे. त्यामुळे हा पाऊस काही प्रमाणात मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. पहा मुंबईसह महारष्ट्रातील पावसाची प्रत्येक अपडेट
#MumbaiRainsLive | In good news for #Mumbai, of the two lakes supplying the city's water, Tulsi is now 63% full (useful content) and Vihar is 34% full (from 33% and 11% respectively just 3 days earlier, on June 29).
File photo: Tulsi lake by Dinesh/Flickr#MumbaiRainsLiveUpdates pic.twitter.com/hpPKVF0F0g
— The Weather Channel India (@weatherindia) July 2, 2019
मागील आठवड्यापासून मुंबईच्या पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. अद्यापही मुंबईत 10% पाणी कपात आहे.