आफ्रिकन बकरीमुळे बदलले अहमदनगर च्या  शेतकऱ्याचे नशीब; इतकी आहे एका बकरीची किंमत
बकरी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

अफ्रीकन बकरीमुळे अहमदनगर मधील एका शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. संदीप परसराम मिसाळ असे या भाग्यशाली शेतकऱ्याचे नाव असून त्याचे समृद्धी बोअर बकरी फार्म आहे. ते अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील भेंडा गावातील रहिवासी आहेत. अनेक वर्षांपासून संदीप या व्यवसायात आहे. आफ्रिकन बकरीला बाजारात बरीच मागणी असून तिची किंमत एका बुलेट बाईक इतकी आहे. विशेष म्हणजे या बकरीचे वजन दररोज 300 ते 350 ग्रॅम इतके वाढते. एका अफ्रिकन बकरीची किंमत 1 लाख 51 हजार इतकी आहे.

संदीप मिसाळ यांनी आपल्या समुद्धी बकरी फार्ममधून तेजस भोईट यांना 1 लाख 51 हजाराला एक बकरी विकली. याचा आनंद त्यांनी फेटा बांधून आणि फटाके फोडून साजरा केला. यावेळी परिसरातील शेतकरी देखील उपस्थित होते. सध्या संदीप यांच्याकडे 15 अफ्रिकन नस्ल च्या मादी बकरी आहेत. यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न तब्बल 15-16 लाख इतके आहे. 2016 पासून त्यांनी समृद्धी बकरी फार्मला सुरुवात केली.

बकऱ्यांची ही तिसरी पिढी असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या नर बकरीपासून जन्मली आहे. बकरीच्या मुलांचे वजन दिवसातून 400 ते 450 ग्रॅम पर्यंत वाढते.  बकरीला दररोज 1 किलो अन्न द्यावे लागते. याची किंमत दिवसाला 30-35 रुपये इतकी आहे. दरम्यान, एक बकरी 2 लाख रुपये उत्पन्न देत असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.