Additional Judge Of Bombay HC: मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) अतिरिक्त न्यायाधीशपदी (Additional Judge) अधिवक्ता मंजुषा अजय देशपांडे (Manjusha Ajay Deshpande) यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. देशपांडे यांच्या नियुक्तीबाबत कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून घोषणा केली. देशपांडे यांच्या नावाची शिफारस भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या वर्षी 18 जुलै रोजी केली होती. कायद्याच्या अनेक शाखांमध्ये, विशेषत: घटनात्मक आणि सेवाविषयक बाबींमध्ये त्या एक सक्षम वकील आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
26 सप्टेंबर 2022 मध्ये, तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने देशपांडे यांच्या नावाची एससी कॉलेजियमकडे शिफारस केली. तथापि, एससी कॉलेजियमने 2 मे रोजी शिफारशीवरील निर्णय पुढे ढकलला आणि युनियनने मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायाधीश (एसीजे) संजय व्ही गंगापूरवाला यांच्याकडून अहवाल मागवला. (हेही वाचा -Derogatory Remarks Against Mahatma Gandhi: संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)
त्यानंतर एसीजेने 10 मे रोजी औरंगाबाद खंडपीठात आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल सादर केला. अहवालावर विचार केल्यानंतर, एससी कॉलेजियमने त्यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली. ज्यानंतर गुरुवारी त्यांचे नाव पदोन्नतीसाठी मंजूर केले. दरम्यान, सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 66 न्यायाधिशांसह 94 न्यायमूर्ती कार्यरत आहेत. मुंबईच्या प्रमुख खंडपीठात आणि औरंगाबाद आणि नागपूर येथील खंडपीठांवर एकूण 10 महिला न्यायाधीश आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर बॉम्बे हायकोर्ट हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे न्यायालय आहे.
एससी कॉलेजियमने मंजूषा यांच्या नावाची शिफारस करताना सांगितले की, आमच्या मूल्यांकनानुसार उमेदवार सक्षम वकील आहे. देशपांडे 1991 पासून 32 वर्षांहून अधिक काळ कायद्याचा सराव करत आहेत आणि कायद्याच्या अनेक शाखांमध्ये, विशेषत: घटनात्मक आणि सेवाविषयक बाबींमध्ये पारंगत आहेत. देशपांडे यांनी 2013 पासून सरकारी वकिलांच्या पॅनलवरही काम केले आहे.
उमेदवाराच्या उन्नतीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर विशेषतः औरंगाबाद खंडपीठासमोर प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकिलांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल. वरील बाबी लक्षात घेऊन आणि तिच्या पदोन्नतीच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला. मंजुषा अजय देशपांडे या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी योग्य आहेत, असे ठरावात म्हटले आहे.