Traffic Advisory In Mumbai Due To Ambedkar Jayanti: 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2024) दादरच्या चैत्यभूमीवर होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रचंड गर्दीमुळे वाहतूक पोलीसही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने वाहतूक व्यवस्था आणि विविध प्रकारचे निर्बंध जाहीर केले असून, ते 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू झाले आहेत. मात्र, दादरला जाणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलीस अतिरिक्त खबरदारी घेत आहेत.
अतिरिक्त पोलिसांसोबतच साध्या वेशातील महिला व पुरुष पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनीही सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले आहे. दादरमधील प्राथमिक मार्ग रानडे रोड 14 एप्रिल रोजी दिवसभर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. एसके बोले रस्ता सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत ‘वन-वे’ करण्यात येणार आहे, म्हणजे पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक जंक्शन हा वाहनचालकांसाठी ‘नो-एंट्री’ पॉइंट असेल. सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन हा SVS रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल. रहिवासी त्याऐवजी रस्ता क्रमांक 5 - पांडुरंग नाईक मार्ग वापरू शकतात. (हेही वाचा -Bhim Jayanti 2024 Images: भीम जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा आज डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस!)
याशिवाय ज्ञानेश्वर मंदिर रस्ताही बंद राहील -
ज्ञानेश्वर मंदिर रस्ताही बंद राहणार आहे. बेस्ट बसेस वगळता सर्व अवजड वाहने, टेम्पोसह मालवाहू वाहने माहीम जंक्शन येथून एलजे रोड मार्गे वळवण्यात येतील.
दक्षिणेकडे जाणारी वाहतूक -
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी कलानगर जंक्शन मार्गे धारावी टी जंक्शन मार्गे सायन रेल्वे स्थानकाकडे जावे किंवा धारावी 60 फूट रोडने सायन हॉस्पिटलच्या कुंभारवाडा मार्गे डॉ. बी.ए. रोडकडे जावे. दुसरा पर्याय म्हणजे वांद्रे मार्गे वांद्रे-वरळी सी लिंक वापरणे. (वाचा - Ambedkar Jayanti 2024 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा महामानवाच्या स्मृतीस अभिवादन!)
उत्तरेकडे जाणारी वाहतूक -
दक्षिण मुंबईतील वाहनचालक - कुलाबा किंवा CSMT - P D’Mello Road, Barrister Nath Pai Road, Zakaria Bunder Road, RAK रोड - नंतर सायन हॉस्पिटलच्या बाजूने पुढे जाण्यासाठी माटुंगा अरोरा ब्रिजवरून उजवीकडे वळावे किंवा वाहतूकीसाठी उत्तर मुंबईच्या दिशेने वरळी-वांद्रे सी लिंक वापरावा.
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाकडून डॉ ई मोसेस रोडने येणारी वाहने सेनापती बापट रोडने पुढे जाण्यासाठी राखंगी चौकात उजवीकडे वळण घेऊ शकतात. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने वडाळा ब्रिज, बरकत अली नाका, बीपीटी कॉलनीचा वापर करू शकतात आणि पुढे जाण्यासाठी ईस्टर्न फ्रीवेचा पर्याय निवडू शकतात.
- रानडे रोड दिवसभर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
- सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन हा एसव्हीएस रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
- ज्ञानेश्वर मंदिर रस्ताही बंद राहील - एसव्हीएस रोडपासून दादर चौपाटीपर्यंत
- पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक जंक्शन हा ‘नो-एंट्री’ पॉइंट असेल
नो-पार्किंग झोन
- एस वीर सावरकर रोड - बाबासाहेब वरळीकर जंक्शन (सेंच्युरी जंक्शन) ते येस बँक
- रानडे रोड, केळुस्कर रोड आणि ज्ञानेश्वर मंदिर रोड.
माहीम आणि दादर येथील सेनापती बापट रोड, एल्फिन्स्टन येथील इंडिया बुल फायनान्स सेंटर, दादरच्या शिवाजी पार्कमधील कोहिनूर मिल कंपाऊंड येथील कोहिनूर स्क्वेअर, सेनापती बापट रोड येथील कामगार स्टेडियम, ज्युपिटर मिल कंपाऊंड येथील इंडिया बुल्स सेंटर आणि फाइव्ह गार्डन आरएके 4 हे पार्किंगचे पर्याय आहेत.