'आदर्श' घोटाळ्याची पुन्हा होणार ईडीकडून चौकशी; शपथ घेण्याआधी अशोक चव्हाणांचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता
ashok chavan (Photo Credits: Newsstate)

महाराष्ट्राच्या राजकारणाच खळबळ माजवणारे एक प्रकरण म्हणजे 'आदर्श' (Adarsh) घोटाळा. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आले काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता नव्याने उभरून आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारात त्यांना स्थान मिळण्याची शक्यता होती. मटाने दिलेल्या वृत्तानुकरपरंतू आता आदर्श घोटाळ्याची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार असल्या कारणाने त्यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. या चौकशीमुळे त्यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचे नवे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण हे देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना आदर्श घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण यांनी राखला काँग्रेसचा किल्ला; भोकर मतदारसंघातून मिळाली लाखो मतं

ईडीनं आदर्श घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. ईडीचे अधिकारी बुधवारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी फ्लॅटमधील मोजणीही केली. याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, या गृहनिर्माण संस्थेविरोधात कारवाईसाठी मालमत्तेची माहिती घेतली.

कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर उभारलेल्या ३१ मजली टॉवरमध्ये नोकरशहा, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. या गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले. या प्रकरणी सीबीआयनं अशोक चव्हाण यांनी आरोपी केले. त्यांना या प्रकरणामुळं मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. अन्य राजकीय नेत्यांचीही चौकशी सुरू आहे.