आसावरी जोशी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश (संग्रहित-संपादित प्रतिमा)

सध्या देशात भाजप विरोधात नाराजी आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मारलेली मुसंडी पाहता, येणारी लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी किती महत्वाची आहे हे दिसून येते. अशात जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी अनके नवीन धोरणांचा अवलंब केला जात आहे. यातीलच एक भाग म्हणजे चित्रपटसृष्टीमधील कलाकारांना पक्षात सामील करून घेणे. बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, आता या पाठोपाठ अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) हिनेही मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आसावरी जोशी हे हिंदी आणि मराठी चित्रपट-मालिकेतील एक लोकप्रिय नाव आहे. त्यामुळे अशा स्टार प्रचाराकाचा फायदा पक्षाला व्हावा या दृष्टीने कॉंग्रेसने आसावरी जोशी यांचे स्वागत केले आहे. यावेळी, लोकसभेचे निवडणूक लढवणार का असे विचारले असता, आता राजकारणात आले आहे, रिंगणात उतरले आहे तर लढल्याशिवाय काय मजा? जर पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर जरुर लढवेन. तसेच पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी सोपवतील ती प्रामाणिकपणे मेहनतीने पार पाडेन असे त्या यावेळी म्हणाल्या. (हेही वाचा : धुळ्यातून फुटणार कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ; 1 मार्च रोजी राहुल गांधी घेणार जाहीर सभा)

काही दिवसांपूर्वी 'भाभीजी घर पर है' मधून घराघरात ओळख निर्माण झालेली, तसेच बिग बॉसची विजेती शिल्पा शिंदे हिने काँग्रेमसध्ये प्रवेश केला होता. अजूनही काही अभिनेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच निरुपम यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर आसावरी जोशी यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते. आता इतक्या मोठ्या स्टारचा कॉंग्रेस कशा प्रकारे फायदा करून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.