पुण्यामधील (Pune) बाणेर (Baner) भागात 57 वर्षीय एसीपीने राहत्या घरी स्वतः गोळी झाडून आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी आणि पुतण्यालाही ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज 24 जुलै पहाटे 3.30 च्या सुमारास घडली आहे. ACP Bharat Gaikwad यांच्या बंगल्यावरच हा प्रकार घडला आहे. अद्याप यामागील कारण समजू शकलेले नाही. सध्या चतुशृंगी पोलिस स्टेशनचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे अमरावती मध्ये ACP म्हणून काम करत होते. सध्या ते पुण्यात आले होते. शनिवारी सुट्टीला आलेल्या भरत गायकवाड यांनी दुसर्याच दिवशी स्वतःसह घरातील 2 व्यक्तींचा जीव घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3.30 च्या सुमारास प्रथम गायकवाड यांनी पहिल्यांदा पत्नीच्या डोक्यात गोळी घातली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि पुतण्या धावत आला. त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी गायकवाड यांनी पुतण्यावर गोळी झाडली जी त्याच्या छातीत लागली. त्यानंतर गायकवाड यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. तिघांचा देखील जागीच मृत्यू झाला. नक्की वाचा: Pune Shocker: धक्कादायक! कौटुंबिक वादातून पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टरने केली आत्महत्या; घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त.
मृतांमध्ये पोलिस ऑफिसरची पत्नी मौनी गायकवाड (44) आणि पुतण्या दीपक (35) यांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या मध्ये पोलिसांना सुसाईड नोट मिळालेली नाही.