मुंबई अहमदाबाद महामार्गावर (Mumbai Ahmedabad National Highway) लिव्ह-इन (Live-in Relationship) कपलवर एका अज्ञात व्यक्तीने अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पुरुषाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वालीव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) असून ते मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. तर त्यांची लिव्ह-इन-पार्टनर सिमा विश्वकर्मा (38) ही हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. (अहमदनगर: Crime Petrol पाहून प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला; आरोपी युवतीला अटक)
हे दोघेही मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलवरून घरी परतण्यासाठी निघाल्यावर रस्ता क्रॉस करताना वर्सोव्हा ब्रिजच्या पेट्रोल पंप जवळील डिव्हायडर येथे थांबले असताना एका अज्ञात इसमाने अॅसिड फेकून हल्ला केला.
अविनाश तिवारी यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर पेशाने वकिल असलेल्या सीमा यांनी त्यांची घटस्फोटाची केस लढवली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्द भारतीय दंड कलम 302, 307 आणि 326a अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिवारी यांच्या मोबाईल फोनमधून महिलांचे अश्लिल फोटोज आणि चॅट सापडले आहेत. खोट्या नावाने तिवारी अनेक महिलांशी चॅट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.