Acid Attack By Wife On Husband: पतीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीनं उचलले टोकाचे पाऊल, घटनेने नागपूर हादरलं
Acid Attack Representational Image (File Photo)

Acid Attack By Wife On Husband: पती आणि  पत्नीच्या वादाचे अनेक घटना आजवर घडल्या आहेत. दरम्यान कौटुंबिक वादात एका पत्नीने आपल्यावर पतीवर अॅसिड हल्ला केला आहे. या घटनेनंतर नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीच्या चारित्र्यावर संशय घेत टोकाचं पाऊल उचलतं हे कृत्य केल्याचे आढळून आले आहे. ही घटना नागपूर शहारतील हुडकेश्वर परिसरात घडली आहे. या थरारक घटनेनंतर पोलिसांनी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा-नेरळमध्ये भिकाऱ्याचा विद्यार्थ्यींवर जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक)

नेमकं काय प्रकरण?

धीरज भीमराव जयपूरे (44) विठ्ठलनगर येथील रहिवासी आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरज यांच पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केल. किरण असं तिचं नाव आहे. किरण आणि धिरज यांच्या लग्नाला तीन वर्ष झाले. मात्र काही महिन्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झाले. किरणने देखील या आधी एक लग्न मोडलं होते. दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून भांडण होऊ लागली. दररोज भांडण होत असल्याने किरण माहेरी वर्धा येथून निघून गेली. दरम्यान धीरजेन किरणला परत येण्यासाठी फोन केला, त्याला परत येण्यासाठी खुप विनंती केली.यामुळे धिरजने तिला नोटीस पाठवली. दरम्यान धीरजच्या या गोष्टीचा किरणला फार राग होता.

धिरज भाजी विक्रीचा काम करून घरी परत आला. यावेळी किरणकडून चहा मागितला. धिरज बेडवर बसून मोबाईल पाहत होता त्यावेळी किरणने त्याला दुसऱ्या कडेला झोपण्यास सांगितले. दरम्यान किरणने रागाच्या भरात त्याच्यावर अॅसिडचा हल्ला करत असताना त्याचा लक्षात येताच, धिरजने किरणचा हात अडवला. यावेळी त्याच्या अंगावर अॅसिड सांडले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिस ठाण्यात किरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.