(संग्रहित प्रतिमा)

अमरावती (Amravati) येथे एका आरोपीने पोलीस ठाण्यातच गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) ही घटना घडली आहे. एका अल्वपयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा त्याच्यावर आरोप होता. संबंधित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. मात्र, त्याने आज (19 ऑगस्ट) सकाळी पोलीस कोठडीच गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर अमरावती पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

सागर ठाकरे (वय, 25) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. सागरविरोधात 4 ऑगस्ट रोजी फेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सागरने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा आणि बलात्काराचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सागर हा अल्पवयीन मुलीसह स्वत:हून फेजरापुरा पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सागरला अटक केली. तसेच संबंधित मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. हे देखील वाचा- Pune Shocking: पुण्यातील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक

त्यानंतर पोलिसांनी सागरला 18 ऑगस्टला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, आज सकाळी सागरने पोलीस ठाण्यात गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर अमरावती शहरात एकच खळबळ माजली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. महत्वाचे म्हणजे, सागरने आत्महत्या का केली? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी, अमरावतीत गेल्या आठवड्यात फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. अनिल मुळे असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.